उस्मानाबाद रिपोर्टर
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद च्या वतीने प्रशांत शशिकांत मते यांची नॅशनल पॅरालिगल वालंटियर (PLV)म्हणून निवड करण्यात आली. ही निवड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू. एस. शेंडे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव वसंत यादव यांनी केली. तसेच न्याय विभाग, भारत सरकार ,यांच्याकडून दिशा उपक्रमांतर्गत विधी साक्षरता व जागरूकता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्य ग्रामीण विकास संस्था ,पुणे कडून विधिदुत प्रकल्पासाठी दिनांक 23 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली .तसेच नॅशनल पॅरालिगल वालंटियर (PLV) व विधिदुत म्हणून निवड झाल्याबद्दल व प्रशिक्षण यशस्वी पुणे पूर्ण केल्याबद्दल प्रशांत शशिकांत मते यांचा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा ) पुण्याचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी व प्रकल्प समन्वयक डॉ. राम पोले यांच्या हस्ते भारताचे संविधान व सर्टिफिकेट देऊन गौरव व सन्मान करण्यात आला.
0 टिप्पण्या