पवनचक्कीच्या गुत्तेदाराकडून पोलीस बळाचा वापर करत शेतकऱ्यांना दमदाटी

उस्मानाबाद रिपोर्टर कवडीमोल किमतीने शेतकऱ्यांना दिला जातोय मोबदला उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये नाईचाकूर आणि कासार शिरशी परिसरामध्ये सुयोग या पवनचक्की कंपनीच्या गुतेदाराकडून शेतकऱ्यांना पोलीस बळ दाखवून कमी भावात जमिन देण्यासाठी बळजबरी केली जात आहे. या प्रकरणांमध्ये थेट जिल्हाधिकाऱ्याने लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून केली जात आहे. उमरगा तालुक्यातील नाईचाकूर ते कासार शिरशी या भागात सुयोग प्रायव्हेट लिमेटेड या पवनचक्कीच्या कंपनीकडून महावितरण सप्लाय जोडण्यासाठी परिसरामध्ये टॉवर लाईनचे काम सुरू आहे. या कामासाठी शेतकऱ्याच्या जमिनी पोलीस भरती दमदाटी करून कवडीमोल किमतीमध्ये घेतल्या जात आहेत. या संदर्भात काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर त्यांना पोलीस पाऊस फाटा बोलवून दमदाटी करत पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बसवले जात आहे. या खाजगी कंपनीच्या उत्तराला शासकीय अधिकाऱ्याचे समर्थन असल्याचे निदर्शनास येत आहे. महत्त्वाचे म्हणजे काही शेतकऱ्यांना जास्तीचा भाव तर काही शेतकऱ्यांना कमी भाव अशा पद्धतीने पवनचक्कीच्या गुत्तेदाराची मनमानी चाललेली दिसत आहे. या सगळ्या प्रकरणाची दखल प्रशासन महसूल विभाग घ्यायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. पवनचक्की गुत्तेदाराचे प्रतिनिधी आम्ही शेतकर्यांना कसल्याही प्रकारचे फसवत नाहीत शेतकर्यांना योग्य तो मोबदला देवून आम्ही शेतकर्यांच्या सहमतीने हे काम करत आहोत शासनाच्या नियमा नुसार आम्ही शेतकर्यांना मोबदला दिला.माञ सुरवातीला 2017 च्या परिपञकानुसार काम सुरु होते परत ते सुधारित 2022 च्या परिपञकानुसार सुरू आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचे शेतकर्यांचे नुकसान झाले नाही. उलट चांगल्या जास्त किमतीचा मावेजा शेतकर्यांना मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या