शेतकऱ्याच्या गाई चोरणाऱ्यास आवघ्या कांही तासात येरमाळा पोलीसांनी केली अटक

धाराशिव रिपोर्टर शेतातील गोट्यासमोर बांधलेल्या जर्सी गाई चोरून नेणाऱ्या चोरट्याला येरमाळा पोलिसांकडून काही तासात अटक करण्यात आले आहे तालुक्यातील हळदगाव येथील विष्णु विनायक गुंड व प्रशांत रमेश सावंत यांचे शेतामध्ये गोठयासमोर बांधलेल्या दोन जर्शी गायी किंमती अंदाजे 1,60,000/- रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची माहीती येरमाळा पोलीस स्टेशन कळली होती तसेच विष्णु विनायक गुड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोलीस ठाणे येरमाळा येथे आज्ञात आरोपविरुध्दं 51/2023 कलम 379 भादंवी भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधिक्षक श्री नवनित कॉवत साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश साहेब यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे येरमाळा येथील ठाणे प्रभारी अधिकारी दिनकर गोरे यांनी गावकामगार यांनी कळवलेल्या माहीतीवरुन तात्काळ बिट अंमलदार प्रकाश चाफेकर यांना बोलावुन घेवुन एक टिम तयार करुन चोरीस गेलेल्या गायचा शोध घेणेकामी हळदगाव, सातेफळ, सौदाणा, येडशी शिवारामध्ये रवाना केले असता पोहेकॉ चाफेकर यांना माहीती मिळाली की हळदगाव येथील सतिश अभिमान सावंत यांने सदरची चोरी केली असावी. सदर इसमाचा शोध पोलीस घेत असतांना सतिश सावंत हा सातेफळ सौंदाणा रोडला तेरणा नदीचे पुलावर चोरीस गेलेल्या गायसह मिळुन आला. पोलीसांनी आरोपी व गायना ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा आवघ्या कांही तासात उघडकीस आणला आहे. सदरची कामगीरी पोलीस ठाणे येरमाळा येथील सपोनि दिनकर गोरे, पोहेकॉ प्रकाश चाफेकर, पोहेकॉ दत्तात्रय राठोड, पोकों परमेश्वर कदम व होमगार्ड मैदाड यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या