उस्मानाबाद रिपोर्टर
सोळा महिण्यापासुन फरार असलेला आरोपी चार महिण्यापासुन राहत होता घराच्या पाचव्या मजल्यावर
सोळा महिन्यापासून फरार असलेला आरोपी डॉ.शेंडगेचे स्ट्रिंग ऑपरेशनच्या करण्यासाठी गेलेल्या पञकारांवरच गुन्हा दाखल आरोपी माञ मोकाटच असुन उमरगा येथिल पोलीस निरीक्षक राठोड यांनी पञकारांवरच गुन्हा नोंद करण्याचा प्रताप केला आहे.त्यामुळे पञकारेतेची गळचेपी झाल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.
उमरगा शहरातील शेंडगे हाँस्पिटल & रिसर्च सेंटर येथे २०२१ मध्ये झालेल्या १००/१५० कोटी रुपयाच्या घोटाळयातील मुख्य आरोपी डाँ. आर. डी शेंडगे हा गेल्या १६ महिण्या पासुन फरार आहे.माञ गेली चार महिने तो उमरगा येथे स्वतःच्या घरीच पाचव्या मजल्यावर राहात असल्याची खाञीलायक माहिती न्युज स्टेट महाराष्ट्र चे रिपोर्टर श्रीराम क्षीरसागर आणि दैनिक जनप्रवासचे संपादक धनंजय पाटील यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे स्ट्रिंग ऑपरेशन करण्यासाठी गेल्यावर आरोपी डाॅ. शेंडगे हा फरार झाला. माञ नंतर दोन दिवसानी उमरगा येथील पोलीस निरीक्षक राठोड यांनी स्ट्रिंग ऑपरेशन साठी गेलेल्या पञकारावरच गुन्हा दाखल केला आहे.
*फरार डाँ शेंडगेना पकडण्याचे विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी दिले होते आदेश*
उमरगा शहरातील डाँ आर डी शेंडगे हाँस्पिटल & रिसर्च सेंटर मधुन रुग्णांची व शासनाची बनावट बिलाद्वारे लुट झाली होती. डाँ आर डी शेंडगे हे गेल्या या प्रकरणी विशेष पोलीस महानिरिक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी डाँ आर डी शेंडगे यांना तात्काळ अटक करा. आरोपी सापडत नसेल तर सीआरपीसी कलम ८२,८३ अंतर्गत संपती जप्त करण्याचे आदेश दिले आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत हे आदेश दिले होते.
उमरगा शहरातील प्रसिद्ध शेंडगे हाँस्पिटल & रिसर्च सेंटर येथे २०२१ मध्ये झालेल्या १००/१५० कोटी रुपयाच्या घोटाळयातील मुख्य आरोपी डाँ आर. डी शेंडगे हे गेल्या १६ महिण्या पासुन पोलीसांना सापडत नाहीत. त्यामुळे पोलीस कारवाई बद्दल उमरगा शहरा मध्ये मध्ये उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत.
उमरगा शहरातील शेंडगे हाँस्पिटल & रिसर्च सेंटर यांनी रुग्ण, महात्मा फुले जन आरोग्य विमा योजना,खाजगी विमा कंपनी यांची बोगस तपासणी अहवालद्वारे फसवणुक केल्या प्रकरणी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीत दोषी आढळले होते. चौकशी समितीच्या अहवालानुसार डाँ अशोक बढे यांनी १२ आँक्टोबर २०२१ रोजी उमरगा पोलीस स्टेशनला डाँ आर डी शेंडगे तत्कालीन प्रयोग शाळा तंत्रज्ञ तानाजी बनसोडे यांच्या विरुध्द भा.द.वी कलम ४२०,४६५,४६८,४७१,३४ अन्वेय गुन्हा दाखल झाला होता. यातील दुसरा आरोपी प्रयोग शाळा तंत्रज्ञ तानाजी बनसोडे याला ५ महिण्या नंतर जामीन मिळाला आहे.तर मुख्य आरोपी डाँ आर.डी शेंडगे अदयाप फरार आहे.
*फिर्यादी झाला आरोपी*.....
या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रयोगशाळा तंत्रज्ञ तानाजी बनसोडे याला आजारी नसताना ३ दिवस अँडमिट दाखवले व खाजगी विमा कंपनीकडुन २८ हजार रुपये घेतले. तसेच तानाजी बनसोडे याला डाँ शेंडगे ज्युनिअर काँलेजचा कर्मचारी दाखवले. हा प्रकार जेव्हा तानाजी बनसोडे याला समजला तेंव्हा फसवणुकीचा प्रथम तक्रार तानाजी बनसोडे यांने दिली.आपली उपजिविका डाँ शेंडगे यांच्या नोकरीवर भागत असल्यामुळे खोटे रिपोर्ट देण्यास भाग पाडत असल्याचे तक्रारी मध्ये बनसोडे यांनी म्हटले होते.
*अशी होती फसवणुकीची पध्दत* .......
रुग्णांचे शेंडगे यांच्या लँबमध्ये रुग्णांचे रक्त पाठवले जायचे तेंव्हा त्यावर विशिष्ट खुण केली जायची. चिट्टीवर वरच्या बाजुला रुग्णांचे नाव एक बाण,२ बाण,३ बाण असले कि रिपोर्ट अहवाल वाढवुन दयायचा बाण खाली असेल तर कमी दयायचा तसेच प्लस असेल तर पाँझेटिव्ह मायनस असेल तर निगेटिव्ह दयायचा अश्या पध्दतीने रक्त तपासणी रिपोर्ट बनवला जायचा या आधारे बिल वाढवुन महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजना सह खाजगी विमा कंपनीकडुन बिल मिळवायचे.
हा प्रकार २०१५ ते २०२१ या वर्षात मोठया प्रमाणात झाला आहे. चौकशी केल्यास हा घोटाळा १०० ते १५० कोटी रुपयाच्या आसपास असु शकतो असे सांगितल जातय.
*तानाजी बनसोडे यांचा आत्मदहनचा इशारा*......
या प्रकरणातील आरोपी तानाजी बनसोडे यांनी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद, पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांना निवेदन देवु देवुन मुख्य आरोपी डाँ आर.डी शेंडगे यांना अटक करण्याची मागणी केली होती.तसेच मुख्य आरोपी डाँ शेंडगे हे उमरगा शहरात सतत येतात, राहतात, दैनंदिन कामे करतात, लातुर,पुणे येथे जातात तरी सुध्दा पोलीस आरोपीला अटक करत मुख्य आरोपी डाँ शेंडगे यांना अटक नाही केल्यास पुढील काही दिवसात मी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करेण असा इशारा दिला होता.
योग्य तपास चालु आहे मुख्य आरोपी डाँ शेंडगे फरार असुन त्यांचा शोध सुरु आहे. उपलब्ध कागद पत्रा आधारे तपास अहवाल देवु.जर तुम्हाला डाँ शेंडगे कुठे आहेत माहिती असल्यास आम्हाला सांगा असा आम्ही पकडु असे बनसोडे यांनी सांगीतले होते.
0 टिप्पण्या