वडजी येथे दिवसा घरफोडी येरमाळा पोलीसांकडून आरोपीला आटक

उस्मानाबाद रिपोर्टर वडजी येथे कुलुप बंद असलेल्या घरातील 65000 रुपया च्या चोरीची घटना 4 मार्च रोजी घडली होती. या घटनेतील आरोपीचा तडकाफडकी येरमाळा पोलीसांनी तपास करुण आरोपीला आटक केली आहे. दि.04.03.2023 रोजी दुपारी 03.00 ते 06.15 वाजण्याचे दरम्यान संदीप लहु मोराळे रा.वडजी हे घराला कुलूप लावून शेतामध्ये कामानिमित्त गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा काडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉक तोडले व कपाटामध्ये ठेवलेले रोख रक्कम 5000 ₹ व सुवर्ण, चांदीचे दागिने असा एकुण 65,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन पोलीस ठाणे येरमाळा येथे गुन्हा गु. रजि. नं. 43/2023 कलम 454, 380 भा.द. सं. प्रमाणे दाखल आहे. गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली व कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक यांच्या सुचनांप्रमाणे येरमाळा पो.ठा. चे प्रभारी सपोनि- . दिनकर गोरे, यांनी एक पथक तयार करुन पोहेकॉ कपील बोरकर यांना मिळालेल्या माहितीवरुन सदर गून्ह्याच्या घटनास्थळांचे शेजारी राहणारी महिला नामे मनकर्णा नारायण मोराळे हिस दि. 12.03.2023 ताब्यात घेवून तिच्या कडे विचारपुस करुन तिच्या घराची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल एक चांदीचा करदोडा, लहानमुलाची पिळ्याची सुवर्ण अंगठी, दोन लहान मुलाचे सुवर्ण बदाम, कानातील सुवर्ण झुबंर व लटकन, एक 64 मण्याचे दोन मंगळसुत्र असलेले सुवर्ण पोत, एक वाळा, एक सुवर्ण अंगठी असा सर्व मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करुन सदर महिलेला रोजी अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कामगीरी पोलीस ठाणे येरमाळा चे प्रभारी सपोनि- श्री. दिनकर गोरे, पोलीस उप निरीक्षक आनंदराव वाठोरे, , पोलीस हावलदार- कपील बोरकर, विशाल गायकवाड, महिला पोलीस हावलदार- तस्लीम चोपदार, पोलीस अमंलदार- शाहरुख पठाण, चालक निसार शेख यांचे पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या