धाराशिव मध्ये स्वराज्यविस्तारक राजे मल्हारराव होळकर जन्मोत्सव समितीची स्थापना

अध्यक्षपदी रवी देवकते तर उपाध्यक्ष पदी अरविंद ढेकणे यांची बिनविरोध निवड
धाराशिव रिपोर्टर दि.4 : धाराशिव शहरात दरवर्षीप्रमाणे16 मार्चला स्वराज्यविस्तारक राजे मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी होत आहे. हा जन्मोत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यासाठी आज जिजाऊ चौकातील स्वयंवर मंगल कार्यालयात समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. बैठकीत स्वराज्यविस्तारक राजे मल्हारराव होळकर जन्मोत्सव समिती 2023 च्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी रवी देवकते, उपाध्यक्षपदी अरविंद ढेकणे, सचिवपदी आकाश ढेकणे, कार्याध्यक्षपदी समाधान ढेकणे, कोषाध्यक्षपदी महेश ढेकणे अशी सर्वानुमते निवड झाली. निवडीनंतर सर्व नुतन कार्यकारिणी सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीत जयंतीनिमित्त जाधववाडी रोडवर असलेल्या राजे मल्हारराव होळकर चौकाचे सुशोभीकरण करण्याचे ठरले. तसेच जयंतीदिनी अहिल्यादेवी चौक, शिवाजी महाराज चौक, जिजाऊ चौक येथे पुजन करुन मोटारसायकल रॅली काढण्याचे ठरले. उपस्थितांना प्रा.बालाजी काकडे, प्रा.मनोज डोलारे, अहिल्यादेवी मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, प्रशांत ढेकणे, श्रीकांत तेरकर यांनी जयंतीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत ढेकणे, भिमराव ढेकणे, प्रा.सोमनाथ लांडगे, बाबासाहेब ढेकणे, संतोष वतने, बालाजी वगरे, नरसिंग मेटकरी, सचिन शेंडगे, रामलिंग मारकड, अशोक गाडेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास बिभीषण गाडे, दयानंद ढेकणे, किशोर डुकरे,किशोर परताडे, गणेश ऐडके, बाबासाहेब ढेकणे, भिमराव ढेकणे, भगवान ढेकणे, गणेश सोनटक्के, संदिप वाघमोडे, तुकाराम जावळे, रामहरी पाटील, नारायण चव्हाण, साई ढेकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी राहुल ढेकणे, रोहन ढेकणे, ओमशिवाय ढेकणे, जगदीश ढेकणे, महेश ढेकणे, पद्माकर ढेकणे, मारूती ढेकणे, बालाजी ढेकणे, राज ढेकणे, रवि ढेकणे, गुरुराज ढेकणे, योगेश ढेकणे, करण ढेकणे, अच्युत ढेकणे, संदिप ढेकणे, विकी ढेकणे, किरण ढेकणे, सुधीर ढेकणे, अमित ढेकणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद ढेकणे तर आभार प्रशांत ढेकणे यांनी मानले. कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या