पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा रुईभर येथील मारहाण झालेल्या महिलेचा इशारा

 


उस्मानाबाद रिपोर्टर

रुईभर येथे झालेल्या भांडणात घरातील पुरुषासह महिलांनाही मारहाण करण्यात आली होती त्याचबरोबर महिलेचा विनयभंग सुद्धा केला असल्याचे निवेदन पीडित महिले कडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे या निवेदनात कलम 354 प्रमाणे गुन्हा नोंद करावा अशी विनंती मारहाण झालेल्या पीडित महिले कडून करण्यात आली आहे .त्याचबरोबर योग्य न्याय नाही मिळाला तर आत्मदहन करण्याचा इशारा उपचार घेत असलेल्या महिलेने दिला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर येथे मागील दोन चार दिवसांमध्ये गावातील काही लोकांनी एका महिलेस व तिच्या पतीसह घरातील महिलांना मारहाण केली होती या संदर्भात बेंबळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर प्रकरणांमध्ये महिलेचा विनयभंग केला असल्याचे त्या महिलेचे म्हणणे आहे.  कलम 354 प्रमाणे गुन्हा नोंद करावा अशी मागणी त्या पीडित महिलेकडून केली जात आहे. सदरची महिलाही उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत असून तिने आम्हाला न्याय नाही मिळाला तर जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद या ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनाही या महिलेने विनंती केली आहे की सदरील प्रकरणांमध्ये मारहाण करणाऱ्या लोकांना खडक शिक्षा देण्यात यावी व आम्हाला न्याय द्यावा असेही सदर निवेदनात  म्हटले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या