45 हजार प्रति क्विंटल विकणाऱ्या चियाची बावी येथिल शेतकऱ्यांनी केली लागवड 


 चिया लागवड प्रयोग झाला यशस्वी 

रिपोर्टर अनिल धावारे

वाशी तालुक्यातील बावी येथील  प्रगतिशील शेतकरी अमोल शिंदे. यांनी आपल्या शेतात कायम पारंपारिक पीक सोडून नेहमी नवनवीन प्रयोगाला पसंती दिली आहे.   त्यांनी शेतात इतर पिकांच्या ऐवजी  महाराष्ट्रात  ( चिया)  म्हणून ओळखले जाणारे हे पीक दीड एकर क्षेत्रावर त्याची लागवड केली आहे.  बावी शिवारात बहरलेले चिया पीक पाहण्यासाठी  जिल्हा व ईतर तालुक्यातील  शेतकरी येत आहेत. या पिकाची लागवड कशा प्रकारे करावी याची माहिती पहाण्यास आलेले शेतकरी अमोल  शिंदे यांच्या कडून घेत आहेत.  सध्या बाजारात तीन- हजार पाचशे रुपये किलो दर मिळत आहे  तर 45 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव या उत्पन्नाला मिळत आहे. भारतात. या पीक ला चिया म्हणून ओळखलं जातं  तर अमेरिकेत याला (सुपर फूड ) या नावाने ओळखले जात हे पीक शुगर, बी .पी. विटामिन.औषध उपयोगी तयार करण्यासाठी  महत्वाचे ठरते. त्यामुळे त्यांनी केलेल्या या नव्या प्रयोगाला यश मिळाल्याचे  दिसत आहे. कापणीचा पहिला फेरा येत्या दोन आठवड्या सुरुवात करण्यात येणार असल्याचे  शेतकरी अमोल शिंदे. यांनी सांगितले. या कामात वडील विजय शिंदे,भाऊ प्रमोद शिंदे यांच्यासह आईचीही मदत होत .असल्याचे त्यांनी सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या