कळंब तालुक्यातील ईटकूर ग्रामपंचायत मध्ये सरपंच पती,ग्रामसेवकाकडून लाखो रुपयांचा घोटाळाएकाच- कामावर दाखवला दोन वेळा खर्च, खोटया सहया करूण लाखो रूपये खिशात

 उस्मानाबाद रिपोर्टर 

ईटकूर ग्रामपंचायत मध्ये सरपंच पती यांनी पत्नीच्या पदाचा गैरवापर करत पत्नीच्या खोटया सहया करून लाखो रुपयांचा अपहार केला आसल्याचे निदर्शनास आले आहे. याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देऊन सुद्धा कसलीच कारवाई झाली नाही.ग्रामसेवक आणि सरपंच पती यांनी संगणमताने हा घोटाळा केला असल्याचे पुराव्यात समोर आले आहे. तरीही प्रशासन गप्प का असा प्रश्न निर्माण होत आहे. सदर घोटाळ्या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तक्रारदार गंभीरे यांनी दिला आहे


 कळंब तालुक्यातील ईटकूर येथील सरपंच आणि त्यांचे ग्राप. सदस्य पती व तत्कालीन ग्रामविकास अधिकरीयांनी संगन मताने जिल्हा परिषद प्रशालेतील शाळेत १५ वा वित्त आयोग आणि ग्रामनिधी मध्ये एकाच कामाची दोनदा बिले उचलली असुन त्यामध्ये अनुक्रमे १) आरोप्लेन्ट साठी १,३०००० रुपये १५ व्या वित्त आयोगा मधुन खर्च आणि त्याचीच दुरुस्ती ३०,००० हजार रुपये ग्राम निधी मधुन खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे.त्याच बरोबरजिल्हापरिषद प्रशालेच्या मैदानात मुरूम टाकणे ५०,००० हजार रुपये १५ वा वित्त आयोगातुन खर्च आणि याच कामाचे ग्रामनिधी मधुन ३०,००० हजार रुपये खर्च दाखवून वरिष्ठ कार्यालय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने एकाच कामावर दोनदा खर्च दाखवून आर्थिक भ्रष्टाचार केला आहे. सदर प्रकरणातील पुरावे आणि निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या सह राज्याचे उपमुख्यमंत्री फडनवीस यांनाही देण्यात आले आहे.जनतेची फसवणूक करून गावच्या सर्वांगिन विकासाठी आलेल्या निधीत आणि जनतेच्य जमलेल्या ग्राम निधीवर आर्थिक भ्रष्टाचार करण्याचा मनात दुष्ट हेतु ठेवून एकाच कामावर दोनदा खर्च दाखवून निधी हडप करून त्याची विल्हेवाट लावली आहे. सदर प्रकरणी सबंधितांची आपल्या स्तरा वरून निपक्षपातीपणे चौकशी होवन दोषीवर कडक कारवाई शासनाकडुन होणे व तक्रारदारांना न्याय मिळणे जरुरीचे आहे. 

 या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करूण सबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आशी मागणी तक्रार दार यांनी केली आहे. अन्यता कळंब पंचायत समीतीच्या समोर तिव्र आंदोलन कारण्यात येईल आशा इशारा देण्यात आला आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या