कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या पुरुषांच्या पत्नीस जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने मिरची कांडप मशीन चे वाटप

 



उस्मानाबाद रिपोर्टर


कोविड 19 मध्ये मृत्यू पावलेल्या पुरुषांच्या पत्नीस मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत मिरची कांडप उद्योगासाठी यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा उस्मानाबाद यांच्या अंतर्गत 1 लाख रुपये कर्ज मंजूर करून वाटप करण्यात आले.


           ही योजना  जिल्हा उद्योग केंद्र यांच्या मार्फत राबविण्यात आली. सदर योजनेतून 25 टक्के अनुदान हे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात आले व उर्वरित रक्कम बँकेने कर्ज स्वरूपी दिले..सदर योजनेमुळे महिलेस रोजगार निर्माण झाला.व आर्थिक मदत होत आहे..


        या उद्योगाचे उदघाटन जिल्हा उद्द्योग केंद्राचे व्यवस्थापक मा.एम.डी. सूर्यवंशी ,युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक मा.कुंभार साहेब, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे साहेब ,प्रशांत मते व आश्विनी वेदपाठक मॅडम व लाभार्थी वर्षा प्रवीण पाटील उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या