तुळजापूर औसा महामार्गावरती आपघाताची मालीका सूरुच : ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

 तुळजापूर रिपोर्टर

उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणारा सोलापूर नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरती तुळजापूर ते औसा या दरम्यान दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे या रस्त्यावरती मागील तीन वर्षात असंख्य लोकांनी रोड अपघातामध्ये आपले जीव गमावले आहेत आज सकाळी साडेसहा वाजता कर्नाटक मधून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला यामध्ये नऊ जण गंभीर जखमी झाले तर सात महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे सदर रोड वरती ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात चुका करण्यात आले असून सुविधेचा अभाव असल्याने सतत या रोडवरती अपघात होताना दिसत आहेत याबाबत तुळजापूर ते औसा या महामार्गालगत असणाऱ्या गावातील ग्रामस्थांकडून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे


तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा व लाख वडगाव या दोन्ही गावाच्या मध्यभागी कारचा भीषण अपघात झाला या अपघातात 9 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे तर यामध्ये 07 महिन्याच्या चिमुकल्याचाही समावेश आहे .जखमींना सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे .हे भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत होते

         याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील 361 महामार्ग वर दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटक येथील भाविक कार ने गाडी क्रमाक KA 38A1006 ने आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरला येत असताना काक्रंबा पासून काही अंतरावर लाख वडगाव जवळ आल असता रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडाला जाऊन जोराची धडक बसली हा अपघात एवढा भयानक होता की जागीच गाडी पलटी झाले .अपघातामध्ये कर्नाटक येथील 09 भाविक जखमी झाली आहेत .जखमींना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले होते  परंतु डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे .या अपघातात सात महिन्याचा मुलीचाही समावेश आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या