प्रा.किरण पाटील यांना निवडून द्या :माजी आमदार सुजितसिंह ठाकूर

 


रिपोर्टर

भाकरी फिरवली नाही तर करपते त्यामुळे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात आता बदल करणे अवश्यक असून भाजपाचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांना प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मताने विजयी करावे, असे आवाहन भाजपाचे जेष्ठ नेते,मा. आमदार श्री सुजितसिंह ठाकूर यांनी केले.  परंडा येथे आयोजित शिक्षकांच्या मेळाव्यात आ. श्री सुजितसिंह ठाकूर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळेस भाजपा जिल्हा चिटणीस श्री विकास कुलकर्णी, भाजपा जिल्हा चिटणीस अॅड. गणेश खरसडे,प्रचार प्रमुख श्री लालासाहेब पाटील, मुख्याध्यापक श्री कांदे, खाजगी शाळा  शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत पवार, पतसंस्थेचे सचिव श्री सुनील पडघन, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडाचे मुख्याध्यापक श्री किरण गरड, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय डोमगाव चे मुख्याध्यापक श्री सुबोधसिंह ठाकूर उपस्थित होते.

आ. श्री ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की, विद्यमान आमदारांना आपण अनेक वर्ष संधी दिली,अनेक वर्ष ते सत्तेमधे होते,परंतु शिक्षकांचे महत्त्वाचे ,जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यास ते पुर्ण पणे अपयशी ठरले आहेत.  सध्या भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना असे लोकाभिमुक सरकार असून समाजातील सर्व घटकांचे प्रश्न यशस्वीपणे हाताळुन सोडवले आहेत, शिक्षकांचे जी.पी.एफ.,पेन्शन योजना ईत्यादी प्रश्न सोडविण्यास आपण भाजपाचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांना प्रथम पसंतीचे मतदान देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे,मी तुमच्या सर्व प्रश्नासाठी मी शासनदरबारी पाठपुरावा करून तुमचे प्रश्न सोडविण्याकरीता अखंड प्रयत्न करील असेही श्री ठाकूर म्हणाले.  यावेळेस मुख्याध्यापक व शिक्षक 250 ते 300  संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री अजित गव्हाणे ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किरण गरड यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याणसागर समुहातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या