बामुक्टा संघटनेचा विक्रम काळे यांना जाहीर पाठिंबा

 उस्मानाबाद रिपोर्टर 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या कार्यक्षेत्रात काम करणार्‍या बामुक्टा या प्राध्यापक संघटनेने औरंगाबाद शिक्षक मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम वसंतराव काळे यांना आपला पाठिबा जाहीर केला आहे.


गेले दोन दशककै. वसंतरावजी काळे व त्यानंतर विक्रम वसंतराव काळे यांनी शिक्षक प्राध्यापकांचे अनेक प्रश्न प्रसंगी स्व पक्षाच्या सरकारशी भांडून धसास लावले आहेत. शिक्षक प्राध्यापकाच्या सर्व प्रश्नाची इतक्या बारकाईने जाण असलेले दूसरे व्यक्तिमत्व मराठवाड्यामध्ये अस्तित्वात नाही. शिक्षक प्राध्यापक अनुदान, भरती, पदोन्नती व सेवानिवृत्ती या सर्व प्रश्नांच्या संदर्भात विक्रम काळे यांनी ज्या चिकाटीने सरकार दरबारी व सभागृहामध्ये प्रश्न मांडले आहेत त्यास तोड नाही. सर्वांना निवृत्तीवेतन मिळावे व त्यासाठी जुनी पेन्शन स्कीम महाराष्ट्रात लागू व्हावी यासाठी स्वतःची पेन्शन पणास लावणारा दुसरा आमदार महाराष्ट्रात नाही.


प्राध्यापकांच्या विविध प्रश्नाच्या ज्यामध्ये रिफ्रेशर कोर्स / ओरिएंटेशन कोर्स / पीएच. डी. च्या आगाऊ वेतन वाढ अशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन स्तरावर समिती गठीत करण्याचे व त्या समितीचा सकारात्मक अहवाल शासनास सादर करण्यात मा. विक्रम काळे यांची महत्वाची भूमिका होती. तसेच प्राध्यापकांना जुनी पेन्शन मिळवून देण्यात बाप्पाचा सिंहाचा वाटा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या