बावी गावावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर: नियमाचे उल्लंघन करणा—यावर होणार कारवाईरिपोर्टर 
वाशी तालुक्यातील बावी येथील ग्रा पं च्या वतीने गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गावातुन बाहेर जाणारा मुख्य रस्त्यासह सर्व छोटे मोठे रस्ते जिल्हापरिषद प्रथमिक शाळा परिसर ग्रामपंचायत कार्यालयाच्या संपूर्ण परिसरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. घरी शौचालय असून देखील बाहेर उघड्यावर शौचास जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आता दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कार्यवाही केली जाणार असून ग्रामपंचायत कार्यालयाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन गावकऱ्यांनी करावे असे जाहीर आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.गावात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असल्याने गावातील अनेक छोटे मोठया चोऱ्या हागणदारी मुक्त गावा कायदा सुव्यवस्था राखण्यासाह प्रत्येक हालचालीवर कॅमेऱ्याची नजर असणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या