महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उस्मानाबाद येथे उद्घाटन


 

रिपोर्टर उस्मानाबाद - 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपाइं (खरात गट) महाविकास आघाडी व विविध शिक्षक संघटनांचे उमेदवार विक्रम वसंतराव काळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उस्मानाबाद येथील ढोबळे कॉम्प्लेक्समधील जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात उद्घाटन करण्यात आले. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, युवक नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, प्रदेश सचिव मसूद शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, जि.प.चे माजी गटनेते महेंद्र धुरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील, जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, ओबीसी काँग्रेसचे धनंजय राऊत, महिला आघाडीच्या शीला उंबरे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राजकुमार मेंढेकर, बालाजी तांबे, संजय कावळे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात विक्रम काळे यांनी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात केलेली कामे तसेच शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत विचार व्यक्त केले. यावेळेसच्या निवडणुकीतही श्री. काळे हे भरघोस मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला जिल्हाभरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या