उस्मानाबाद येथे आमदार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ उदया शिक्षक मेळावा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील राहणार उपस्थित

 

उस्मानाबाद रिपोर्टर 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे( शिवसेना)  आरपीआय( खरात गट)  इतर पक्ष, महाविकास आघाडी आणि विविध शिक्षक संघटनांचे उमेदवार आ.विक्रम  काळे यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक २५ जानेवारी 2023 रोजी सायंकाळी ४ वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक उस्मानाबाद येथे शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

      यावेळी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून  माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी मंत्री बसवराज पाटील, आ कैलास पाटील, माजी आमदार राहुल मोटे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, संजय निंबाळकर, संजय पाटील दुधगावकर, सक्षणा सलगर, विश्वासअप्पा शिंदे, राजाभाऊ शेरखाने, मसूद शेख,अशोक पवार, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ .रमेश दापके,प्राचार्य अशोक मोहेकर आदींची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, निदेशक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षक मेळावा संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या