तुळजापूर औसा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा- एकाच ठिकाणी तीन वर्षात गेले 21 जणांचे जीव

 उस्मानाबाद रिपोर्टर

गुत्तेदाराकडून करण्यात आले  निकृष्ट दर्जाचे काम


उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर ते औसा हा 361 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग हा महामार्ग नसून मृत्यूचा सापळा असेच म्हणावे लागेल खाजगी कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावरती अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत तुळजापूर ते नागपूर या महामार्गाचे काम तीन वर्षाखाली दिलीप बिल्डकॉन या खाजगी कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले आहे मात्र या कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अनेक लोकांना रोड अपघातामध्ये आपले जीव गमवावे लागले आहेत तुळजापूर ते औसा या महामार्गाचे काम बिल्डकॉन या कंपनीकडून अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून या रस्त्यावर सतत अपघात होताना पाहायला मिळत आहेत कंपनीच्या माध्यमातून रोडवरती बांधण्यात आलेले पूल हे जुनेच असून जुन्याच पुलावर्ती नवीन रंग रंगोटी करण्यात आलेली आहे त्यामुळे या फुलांचा धोका कधीही निर्माण होऊ शकतो त्याच बरोबर सिमेंट रोडवरती ठिकठिकणी भेगा पडलेल्या पहायला मिळत आहेत.  राष्ट्रीय महामार्ग नियम प्रणालीनुसार घालून देण्यात आलेल्या नियमाचे पालन या कंपनीकडून कुठेही करण्यात आलेले नाही रस्त्याच्या दुभाजकावर सिग्नल पॉईंट नसल्यामुळे दुभाजकाला धडकून अनेक वेळा अपघात झालेले आहेत . रस्त्याच्या साईड चे रोड बनवण्यात आले नाहीत .रोडच्या कडेला नियमानुसार झाडे लावण्यात आली नाहीत. प्रवाशांसाठी तुळजापुर ते उजनी या दम्यान टाॅयलेट बाथरुम ची सोय नाही आशा आनेक प्रकारच्या सुविधांचा अभाव या माहामार्गावरती त्यामुळे वाहान धारकांना आपघाताला बळी पडावे लागत आहे.  या महामार्गाचे काम व्यवस्थित करावे अशी मागणी अनेक वेळा रोड लगतच्या गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या