नवउद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग व्यवसाय वाढवावा अजय वाघाळे

: उस्मानाबाद रिपोर्टर

उद्योग संचालनालय जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद, पुरस्करत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उस्मानाबाद आयोजित सर्वसाधारण घाटातील योजनेअंतर्गत मसाला निर्मिती उद्योगावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम उस्मानाबाद ,या कार्यक्रमात प्रशिक्षण अर्थीना मार्गदर्शन करताना उद्योजक अजय वाघाळे व समन्वयक प्रशांत मते हे उपस्थित होते सदरील प्रशिक्षण हे दिनांक 21 /11 /2022 ते 18/ 12/ 2022 दरम्यान घेण्यात येत असून उस्मानाबाद शहरातील व ग्रामीण भागातील महिलांना मसाला उद्योग निर्मितीचे प्रशिक्षण जिल्हा उद्योग केंद्र मार्फत देण्यात येत आहे ,प्रशिक्षणार्थ्यांना उद्योजकीय मानसिकता घडविण्यासाठी विविध विषयाचे मार्गदर्शन जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत दिले जाते ,त्यामध्ये उद्योग उभारणीसाठी जागेची निवड ,प्रकल्प अहवाल तयार करणे ,उद्योग अनुसार राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्ज प्रकरण संदर्भात मार्गदर्शन ,योग्य मशनरीची निवड,मसाला उदोगाच  प्रत्यक्ष, मार्केटिंग व संवाद कौशल्य ,उद्योग वाढीसाठी लागणारे साहित्य उद्योजक मासिक व इतर विषयी मार्गदर्शन दिले जाते सदरील कार्यक्रमात  उद्योजक  अजय वाघाळे यांनी ट्रॅडिशनल मार्केटिंग व ऑनलाईन मार्केटिंग विषयी माहिती सांगताना म्हणाले सध्याच्या युगामध्ये डिजिटल मार्केटिंगला उपयोग होत असून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत डिजिटल मार्केटिंग द्वारे पोहोचता येते,त्यामुळे उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होते, यामुळे दोघांचेही वेळेची व पैशाची बचत होते, ग्राहकांनाही योग्य मालाची निवड करता येते, नवउद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 

 उद्योग व्यवसाय वाढवावा असे ते म्हणाले,यावेळी एम सी एडी चे प्रकल्पधिकारी पांडुरंग मोरे, समनव्यक प्रशांत मते व प्रशिक्षण अर्थी मोठया संख्येने उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या