पत्रकार बालाजी बिराजदार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर


 

======================================

उस्मानाबाद  रिपोर्टर

जिल्ह्यातील लोहारा येथील पत्रकार बालाजी बिराजदार यांना स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान कडून देण्यात येणारा महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, अंधश्रद्धा, पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या मान्यवरांचा सन्मान-गौरव करता यावा या उद्देशाने स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान दोन वर्षापासून महात्मा जोतिबा फुले स्मृती पुरस्कार देवून गौरव करण्यात येत आहे. यावर्षीचे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षीच्या स्मृतिशेष स्मृती पुरस्कारांची घोषणा महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त करण्यात आली. यात लोहारा येथील पत्रकार बालाजी बिराजदार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बालाजी बिराजदार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पुरस्कार वितरण समारंभ स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर यांच्या स्मृतिदिनी होणार असल्याचे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संजय वैरागकर, सदस्य सूर्यकांत वैरागकर, गिरिजाकांत वैरागकर, श्रीशैल्य बिराजदार, प्रविण स्वामी यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या