बावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी


रिपोर्टर 

वाशी तालुक्यातील बावी येथे इतिहास कालीन जागृत असलेले ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी झाली.या यात्रेला  परिसरातील सोनारवाडी, ऊमबंर, पानगाव,परतापुर, खामकरवाडी या गावातील भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी केली होती प्रतेक वर्षी साजरी होणारी ही यांत्रा दोन वर्ष कोरोनाच्या काळात थांबली होती मात्र या वर्षी मोठया संख्येने भाविक या यात्रेला उपस्थित होते.परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा देवस्थानाची यात्रा मंगळवार.२९ नोव्हेंबर रोजी माणिक दंड शिवार येथे उत्साहात झाली.खंडोबाच्या मूर्तीला अभ्यंगस्नान घालून अभिषेक व विविध विधी पूर्ण करण्यात आल्या तसेच दिवसभर मंदिरात भाविक तळी भंडार उचलुन भंडारा.खोब—यांची उधळण करत होतेेे. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत या परिसरातील ग्रामस्थ मंदिराला दोन प्रदक्षिणा घालुन मिरवणुकी नंतर ज्येष्ठ वारू कडून आगामी वर्षाची भाकणूक भविष्यवानी करण्यात आली. तसेच हलगी संबळ ताशाच्या गजरात मानाचा लंगर तोडण्यात आला.तसेच यावेळी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या