दोन दिवसीय महाआरोग्य शिबिरात दिड लाखांपेक्षा जास्त तपासणी - रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा कायम ठेवू- आरोग्य मंत्री सावंत

 उस्मानाबाद रिपोर्टर 

 

       रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा मानून यापुढेही कायम अशाच पध्दतीने जनतेची सेवा करू असे आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी सांगून आपण कायम जनतेच्या ऋणात राहू असे सागितले. 

    परांडा येथील दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. 

   समारोप समारंभास शिबिराचे सहआयोजक प्रा.शिवाजीराव सावंत, आयोजक डाॅ.धर्मेंद्र कुमार यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना मंत्री सावंत म्हणाले की दोन दिवसीय महाआरोग्य शिबिरात दिड लाखापेक्षा जास्त रूग्णांची तपासणी अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने झाली, ही नुसतीच तपासणी नव्हती तर याच ठिकाणी औषधोपचार तसेच विविध चाचण्या आणी पुढील आधिक उपचार हे करण्यात येणार आहेत. या महाआरोग्य शिबिरात उस्मानाबाद, सोलापूर,लातूर,बीड या जिल्ह्य़ातील रूग्णांची तपासणी करण्यात आली. दोन महिन्यां पासून याची तयारी सुरू होती ,त्याची परिनीती ही लाखो रूग्णांची तपासणी व औषधोपचार ही आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील रूग्णांची तपासणी करण्या मागची भूमिका ही या भागातील मायमाऊली तसेच वडिलधारी मंडळी ही चांगल्या औषधोपचारा पासून वंचित राहू नये एवढेच नाहीतर त्यांचा  औषधोपचारासाठी अवाढव्य खर्च आपण त्या खात्याचा मंत्री असताना होऊ नये ही होती. घेतलेला संकल्प हा सर्वांच्या मदतीने ,सहकार्याने आपण ध्येयाकडे नेला याचा मला आनंद आहे. दोन दिवसीय शिबिरात काही उणीव राहील नसेल असे मला वाटते ,परंतू तसे काही राहिले असल्यास आपण ते समजून घ्याल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

    समारोप भाषणातून प्रा.शिवाजीराव सावंत यांनी या दिड ते दोन लाख रूग्णांनी रूग्ण सेवेची जी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून अशीच सेवेची आपण कायम संधी द्याल असा विश्वास व्यक्त करून पुढील तपासणी आणी पाठपुराव्यासाठी संपर्कात राहाण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. 

आयोजक डाॅ.धर्मेंद्र कुमार यांनी आपल्या भाषणातून गिनज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याही महाआरोग्य शिबिराची निश्चित दखल घेतल्या जाईल असे हे शिबिर झाले असून आपण सर्वांनी खुप छान आयोजन नियोजन याचे केले होते, त्यातूनच हे शिबिर यशस्वी होऊ शकले. आपण सर्वांनी या शिबिराच्या माध्यमातून आपली तपासणी स्पेशालिस्ट डॉक्टर्स कडून करून घेतली आहे, याही पुढे कुठलाही त्रास जाणवला तर त्याच स्पेशालिस्ट डॉक्टर्स कडे आपण दाखवू शकता असे यावेळेस सांगितले. 

  शिबिराच्या समारोप प्रसंगी शिबिरासाठी अहोरात्र मेहनत घेणारे डॉक्टर्स, आरोग्‍य कर्मचारी, आशाताई, कामगार तसेच विविध विभागाचे आधिकारी कर्मचारी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

   या महाआरोग्य शिबिरास दोन दिवसात तीन लाख नागरीकांनी उपस्थिती दर्शवून महाआरोग्य शिबिर न भूतो न भविष्यती असे केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या