मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्यासाठी संवाद परिषदचे आयोजन ॲड रेवण भोसले यांची माहितीउस्मानाबाद रिपोर्टर 

     मराठवाड्यचा अविकसितपणाचा कलंक, द्रारिद्रयपणा कायमचा नाहीसा करण्यासाठी  मराठवाडा स्वतंत्र राज्य करणे काळाची गरज आहे ,याच मागणीसाठी संवाद परिषदेचे सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले आहे  , यासाठी मराठवाड्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते , बुद्धिवंतानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  मराठवाडा मुक्ती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस ॲड रेवण भोसले यांनी केले आहे.

     मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा चालू आहे, याच लढ्याचा एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह उस्मानाबाद येथे एक दिवशीय संवाद परिषदेचे आयोजन केले आहे.

     या संवाद परिषदेसाठी प्रमुख अतिथी म्हणून ॲड गुणरत्न सदावर्ते,  मराठवाडा मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष जे . के. जाधव,  संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबा उगले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

     याशिवाय स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी सक्रिय असलेले मराठवाडा मुक्ती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे, डॉ. परमेश्वर गुट्टे, प्रदेश संघटक डॉ. भागवत नाईकवाडे,  युवती प्रदेशाध्यक्ष अमृता चव्हाण,  महिला प्रदेशाध्यक्ष विद्याश्री सूर्यवंशी,  प्रदेश महिला सचिव शकीला पठाण,  प्रचार प्रमुख रवींद्र बोडखे, युवा प्रदेशाध्यक्ष इंद्रजीत पाटील,  सल्लागार राम गायकवाड, ज्येष्ठ विधीज्ञ बशारद अहमद,  जिल्हाध्यक्ष दादासाहेब जेटीथोर,  जिल्हा संघटक विजयसिंह पाटील, ॲड महेश धनावत जालना यांचीही उपस्थिती राहणार आहे.

     या एकदिवसीय संवाद परिषदेमधून प्रकर्षाने आजपर्यंत प्रत्येकवर्षी मराठवाड्याला दुय्यमपणाची वागणूक मिळाली, मराठवाड्याच्या विकासासाठी समर्पक निधी दिला गेला नाही, यामुळे मराठवाड्याला अविकसितपणाचा कलंक लागला आहे, मराठवाड्यामध्ये मोठे मोठे उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी मुबलक दळणवळण, रस्ते, पाणी, वीज पुरवठा मुबलक, कुशल कामगार वर्ग , हवामान उपलब्ध असताना केवळ राज्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात, साखर सम्राटाच्या भागातच अधिकाधिक सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

      मराठवाड्याला दुय्यम वागणूक दिलेली आहे, या मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी मराठवाडया बाहेर जायची वेळ आली, परिणामी मराठवाड्याला सुजलाम, सुफलाम करण्यासाठी मराठवाडा स्वतंत्र राज्य होण अत्यंत गरजेचे आहे , याच मागणीसाठी सातत्याने संघर्ष गतिमान केला जाणार आहे, त्याच दिशेने संवाद परिषदेमध्ये ध्येय धोरण देखील ठरणार आहे.

      या संवाद चर्चेत मराठवाड्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, चळवळतील अनुभवी युवक, युवतीने सहभाग घ्यावा, उपस्थित राहावे असे आवाहन स्वतंत्र मराठवाडा राज्य मागणीचे आणि मराठवाडा मुक्ती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस ॲड रेवण भोसले यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या