आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना दिला १ लाख रुपयांचा धनादेश

 


उस्मानाबाद रिपोर्टर 

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत शासकीय योजनांचा महामेळाव्या दरम्यान उस्मानाबाद तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसास १ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी राजाराम केलूरकर यांच्या हस्ते दि.१३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. उस्मानाबाद नगर परिषदेच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शासकीय योजनांची माहिती जनतेला व्हावी यासाठी शासकीय योजनांचा महामेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उस्मानाबाद तहसील कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला मिळावी यासाठी नायब तहसिलदार केलूरकर यांनी उस्मानाबाद तालुक्यातील खामसवाडी येथील आत्महत्या केलेल्या विश्वास मुळे यांच्या पत्नीस १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर शिंगोली, सांजा व शेकापूर येथील जवळपास ५० लाभार्थ्यांना ज्यांचे रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका फाटलेली आहे ती नवीन देणे. महात्मा गांधी जन आरोग्य योजनेचे प्रमाणपत्र दिले. तसेच तलाठ्यांच्या माध्यमातून विधवा, अपंग यांना संजय गांधी योजनेच्या प्रस्ताव  घेऊन माननीय तहसीलदार यांच्यामार्फत मंजुरी करून  दर महिन्याला लाभार्थ्यांना लाभ दिला जातो . विशेष बाब म्हणजे ज्यांना शासनाच्या विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते अशांना देखील प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तहसीलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नायब तहसीलदार बोथीकर अव्वल कारकून धवन,वाघमारे सहाय्यक लिपिक ,शुभम काळे,संतोष सरगुले,  शिरसागर , निरफळ तलाठी वरील अधिकारी आणि कर्मचारी हजर होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या