राज्यपालांच्या हस्ते मयुर काकडे यांना एनजीएफ चा राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार 2022 प्रधानरिपोर्टर

मुंबई- ' नूतन गुळगुळे फाउंडेशन तर्फे देण्यात ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे येणाऱ्या सातवे वर्ष . हा सोहळा शनिवार दि . ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर , प्रभादेवी येथे पार पडला महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . या सोहळ्यात विविध क्षेत्रात अपूर्व आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला . संपूर्ण भारतातून या पुरस्कारांसाठी जवळपास ३65 प्रवेश अर्ज आले होते , त्यातून 09 पुरस्कार दिले गेले असून त्यांची घोषणा व पुरस्कारांचे वितरण एकाचवेळी जाहीर करण्यात आली होती . या सोहळ्यास ' नानावटी मॅक्स हॉस्पिटल'चे ज्येष्ठ कर्करोग सर्जन डॉ . संजय दुधाट , एसबीआय जनरल इन्शुरन्स'चे उप व्यवस्थापकीय संचालक आनंद पेजावर तसेच ' कोचीन शिपियार्ड लिमिटेड , भारत सरकार'च्या संचालक आम्रपाली साळवे , नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या अध्यक्षा नूतन विनायक गुळगुळे यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी मयुर काकडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना

सदरील ध्येयपूर्ती पुरस्कार 2022 हा मी माझ्या आई वडिलांना समर्पित करतो,आदरणीय बच्चू भाऊ यांनी केलेले आजवरचे मार्गदर्शन व माझ्यासारख्या दिव्यांग व्यक्तीला समाजात एक स्वतंत्र स्थान प्राप्त करून दिल्याबद्दल व त्यांच्या विचाराने आजपर्यंत केलेल्या कार्याची ही आज मिळाली पावती असून कार्यक्रमाचे आयोजक नूतन गुळगुळे व त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानून,संघटनेतील आज पर्यंतचे सर्व सहकारी जे प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत ठाम राहून मोलाची साथ दिली अश्यांचे तसेच मित्रपरिवार व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार त्यांच्या भाषणातून मांडले


मयुर काकडे यांच्या कार्याबद्दलची आजपर्यंतची काही माहिती

निसर्गानं जन्मतःच अपंगत्व दिलं असलं तरी,आपल्या सदृढ मनाने त्या अपंगत्वावर मात करून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा आणि सदृढ लोकांनाही आपला आधार वाटणारा एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून  उस्मानाबाद जिल्ह्यात आपल्या  सामाजिक कार्याची एक वेगळी ओळख निर्माण करून , ज्याला अनेक सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित केला असा नवतरुण म्हणजे...

 मयूर ज्ञानेश्वर काकडे 

जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली या छोट्याशा खेडेगावात  15/06/1985 रोजी झाला,वडील ज्ञानेश्वर काकडे वाहनचालक, आई गृहिणी.

मयूर काकडे यांनी आपले पदवी/पदवित्तर शिक्षण राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयात पूर्ण केले.महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक कार्यात हिरीरीनी सहभाग घेणारा हा तरुण आपल्या अपंगत्वावर मात करून या तरुणाने समजला व विशेष करून आपल्या हजारो अपंग बांधवाना आधार देण्यासाठी 2010 पासून सामाजिक कार्यास वाहून घेतले.त्याचीच पावती म्हणून मयूर काकडे याना आजपर्यंत विविध सामाजिक संस्थनी आपले पुरस्कार देऊन लौकिक केला आहे त्यापैकी पुरस्कार म्हणजे ....


1) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने  सलग 5 ते 6 वर्ष सामाजिक कार्य व दिव्यांग क्षेत्रात कार्यकेल्याबाबद्दल दिव्यांगरत्न पुरस्कार.

2) महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटनेच्या वतीने दिव्यांग भुषण पुरस्कार,

3) निवडणूक विभाग उस्मानाबाद च्या वतीने दिव्यांग मतदार नोंदणी मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सलग दोन वर्षे 

4) अवेरनेस ग्रुप उस्मानाबाद च्या वतीने सामाजिक योगदान बद्दल अवेरनेस अवॉर्ड ,

5) सक्षम पोलीस टाइम्स च्या वतीने सक्षम दिव्यांग योद्धा पुरस्कार,

6) प्रहार समाज रत्न पुरस्कार,

7) शिवाश्रम प्रतिष्ठान शिर्डी च्या वतीने दिव्यांग क्षेत्रात काम केल्याबद्दल पुरस्कार,

8) प्रहार च्या वतीने उत्कृष्ठ प्रतिनिधी म्हणून राज्यात प्रथम प्रहार पुरस्कार.

 असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.खऱ्या अर्थाने मयूर काकडे यांनी आपले अपंगत्व बाजूला सारून, त्यांनी हजारो लोकांना आपल्या सामाजिक कार्यातून मदत करून ,ते या समाजाचा एक कणाच ठरले आहेत.अशा संवेदनशील मनाच्या समाजसेवकास आमचा मनापासून सलाम🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या