भारतीय किसान संघाच्या वतीने 19 डिसेंबर रोजी दिल्ली येथे किसान गर्जना रॅलीचे आयोजन
रिपोर्टर 

भारतीय किसान संघ ही एक  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचांराशी जोडलेले देशभरातील शेतकऱ्यांचे गैर राजकीय संघटन आहे.याच भारतीय किसान संघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी दिल्ली येथे  दि. 19 डिसेंबर रोजी किसान गज्रना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये देशभरातील किसान संघाचे कार्यकर्ते व लाखों शेतकरी एक दिवशीय धरणे आंदोलनासाठी रामलिला मैदान दिल्ली येथे जमणार आहेत. भारतीय किसान संघाच्या पहिल्या 1979 च्या अधिवेशनामध्ये मांडलेल्या प्रस्तावामध्ये हे स्पष्ट करण्यात आले होते की शेतमाल्याच्या उत्पादन खच्रामध्ये एक निश्चित लाभ वाढवून लाभकारी मुल्य मिळाले पाहिजे. ही प्रमुख मागणी घेऊन भारतीय किसान संघ गेल्या 40 वषे पासून संघर्ष करीत आहे. या सोबतच इतर मागण्या भारतीय किसान संघाच्या वतीने करण्यात येणार आहेत. यामध्ये किसान सन्मान निधी मध्ये पुरेशी वाढ व्हायला पाहिजे कारण आज शेतकर्यांचे उत्पन्न मजुरांच्या उत्पन्नापेक्षा कमी आहे. सोबतच रासायनिक खतांच्या कंपन्यांना दिले जाणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति एकराच्या प्रमाणात डिबीटी द्वारे मिळावे.क्रुषी निविष्ठावर जीएसटी आकारू नये. या विविध मागण्यासाठी  देशभरातील शेतकरी दिल्ली येथे किसान गज्रना रॅली करणारून केंद्र सरकारला आपल्या मागण्या सादर करतील. यासाठी सव्र शेतकऱ्यांनी अन्यायाविरुद्ध गज्रना करून स्वतःच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी गावागावात जनजागरण करून दि‌ 19 डिसेंबर 2022 रोजी राजधानी दिल्ली मधील रामलीला मैदानामध्ये आयोजित किसान गज्रना रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने सामिल होण्याचे आवाहन भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांताच्या वतीने उपाध्यक्ष रावसाहेब शहाणे पाटील व भारतीय किसान संघ धाराशिव जिल्हा संयोजक नितीन घुले वाशी यांनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या