उस्मानाबादच्या टेनीक्वॉइट मुलीच्या संघाने राज्य स्पर्धेत सुवर्णपदक व जनरल चॅम्पियनशीप पटकावून केली सुवर्ण कामगिरी.






 उस्मानाबाद रिपोर्टर:

 नुकत्याच संपन्न झालेल्या धुळे  जिल्ह्यातील दोंडाईचा येथे  ३५ व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर टेनीक्वाईट ( रिंग टेनिस )स्पर्धेत उस्मानाबादच्या मुलीच्या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे. अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष नितीन बागल व सचिव बिभिषण पाटील यांनी दिली.

दोंडाईचा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे दि.३० सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर २०२२ दरम्यान झालेल्या ३५  व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर स्पर्धेत उस्मानाबादच्या मुलीच्या संघाने इतिहास घडवला आहे राज्यस्तरीय टेनीकॉइट स्पर्धेत  संघाने प्रथमताच राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला असून जनरल चॅम्पियनशीप  उस्मानाबादच्या खेळाडूंनी मिळविली आहे.

मिक्स डबलवमध्ये मुली प्रथम क्रमांक, मुली सिंगल द्वितीय क्रमांक,डबल मुली द्वितीय क्रमांक,मुले डबल द्वितीय क्रमांक कामगिरी केल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याकडे राज्य स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे या संघात कु.अश्विनी जाधव, ऋतुजा मसे, गायत्री जागीदार, गायत्री नरसिंगे, अंजली धोंड, जान्हवी सलगर*  तर मुलांमध्ये अथर्व गहित,सुमित काकडे,अनिकेत नरसिंगे,प्रवीण पवार,सार्थक जहागीरदार, मंथन माळी यांचा समावेश आहे. संघास रामकृष्ण खडके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.तर  व्यवस्थापक म्हणून शिवकांची काकडे हिने काम पाहिले.

विजय संघाचे अभिनंदन असोसिएशनचे अध्यक्ष नितीन बागल सचिव बिभीषण पाटील, विक्रम पाटील,कोषाध्यक्ष गुणवंत काळे, मोहन पाटील, दादा देशमुख, अमर राऊत ,योगेश थोरबोले, अजिंक्य  वरळे बाहुबली नवले, दिलीप बदाले, कुलदीप सावंत,प्रवीण गडदे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या