नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ




उस्मानाबाद रिपोर्टर 


भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र कार्यालय उस्मानाबाद च्या वतीने जिल्हा भरात स्वच्छ भारत 2.0(clean India ) अभियानाचा शुभारंभ नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मा. धनंजय काळे यांच्या हस्ते करण्यात आला.

   भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद कार्यालयाच्या वतीने स्वच्छ भारत २.०(clean India) अभियान २ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर पर्यंत जिल्हा भरात राबवण्यात येणार आहे. यावेळी नेहरू युवा केंद्राचे वैभव लांडगे, रविकांत सुरवसे,प्रदीप साठे,श्री. पुरुषोत्तम बेले,रुपेश उमरदंड, जिल्हा सल्ला समिती सदस्य व महाराष्ट्र उद्योजक्ता विकास केंद्र उस्मानाबादचे कार्यक्रम समन्वयक प्रशांत शशिकांत मते तसेच जास्तीत जास्त युवा मंडळ,युवती मंडळ, स्वयंसेवक, सामाजिक संस्थांनी स्वच्छ भारत २.०(clean India) अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या