नवराञी महोत्सवा निमीत्त महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष नवदुर्गांच्या हास्ते होणार तुळजाभवानी मातेची आरती

रिपोर्टर

नवरात्रीनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील आरती महाराष्ट्रातील नामांकित व कर्तव्यदक्ष महिलांच्या हस्ते करण्येचे  योजित केले असुन हा स्तुत्य आणि नवीन उपक्रम असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली

महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन शक्तीपीठे असून धाराशिव जिल्ह्यातील सुरक्षेत्र तुळजापूर येथील देवी हे मुख्य पूर्ण पीठ ओळखले जाते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो घराण्याची कुलदेवता आई तुळजाभवानी हे देवीचे एक जागृत प्रमुख शक्तीपीठ आहे अख्या महाराष्ट्राची तारणहार कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनीचे नवरात्रीतील रूप व आई दुर्गेचे शक्तीचे तेज हे आवरणीय आहे नवरात्रीचा सुवर्ण मध्ये साधून यावर्षी तुळजापूर देवस्थानच्या वतीने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नवदुर्गांच्या हस्ते नऊ दिवस कुलस्वामिनीची त्यांच्या हस्ते आरती व त्यांच्याशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे यामध्ये प्रामुख्याने दि, 29 सप्टेंबर रोजी डॉक्टर मुजुमदार प्रा. कुलपती सिंबायोसिस  दि. 30 सप्टेंबर रोजी तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर दि.1 ऑक्टोबर रोजी कल्पना सरोज अध्यक्ष कमानी प्रायव्हेट लिमिटेड तसेच आमदार उमा खोपकर महिला प्रदेश अध्यक्ष भाजपा, दि. २ ऑक्टोबर रोजी चित्रा वाघ प्रवक्त्या भाजपा दि. 4 ऑक्टोबर रोजी झेलम पाटील संचालक केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आदींच्या हस्ते तुळजाभवानी मातेची आरती करण्याचे आयोजन केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या