बावी येथे पशु रोग प्रतिबंधक लसीकरणाला वेग

रिपोर्टर


वाशी तालुक्यातील बावी येथील जिल्हा व तालुका पशु आरोग्य विभागाने  महाराष्ट्र लाईव्ह च्या बातमीची तात्काळ दाखल घेत  दि.१६ रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या बातमीमुळे बावी अंतर्गत येणारे मांडवा पशु उपकेंद्र येथून बावी येथे तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आर शिंदे.यांनी पशुपालक यांच्याशी संवाद साधून पशु लाळ खुरकूत फऱ्या लम्पी सारख्या रोगावर प्रतिबंधक लसीकरण मोहीम बावी येथे सुरुवात केली आहे. गाय .म्हैस. बैल. शेळ्या. मेंढ्या. इत्यादी पाळीव. (४००) हून अधिक जनावरांना लसीकरण मोहीम संपन्न झाली असून उर्वरित टप्पा लवकरच दोन दिवसात संपवून टाकू असं आव्हान महाराष्ट्र लाईव्ह शी बोलताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शिंदे यांनी सांगितले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या