रिपोर्टर
वाशी तालुक्यातील बावी येथे पशु लाळ खुरकूत फऱ्या रोग प्रतिबंधक लसीकरण चार ते पाच वर्षापासून अद्यापही रखडलेले च असून त्याच्याकडे तालुका. जिल्हा पशुसंवर्धन प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. राजस्थान. पंजाब. पाठोपाठ महाराष्ट्रात देखील दाखल झाला लम्पी त्वचारोगाने पशुधनावर मोठे विघ्न आणलेआहे. बावी येथील सर्व सामान्य शेतकरी राजा गाई. म्हशी. पाळीव. जनावरांच्या दुधावर आपलं घर प्रपंच चालवतो मुलांचे शिक्षण दवाखाना असेल इतर किरकोळ खर्च दुधावर निघून जातो या लम्पी रोगाची लागण जर जनावरांना होऊन दगावले तर सर्व सामान्य व शेतकरी चा प्रपंच कसा चालवायचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी पशुसंवर्धन विभाग ने तात्काळ रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम बावी येथे राबवावीअशी मागणी पशुपालक व सर्व गावकऱ्यां च्या वतीने होत आहे.
0 टिप्पण्या