आरोप खरे असतील तर घोडके यांना एक लाख बक्षिस देऊः ढेपे

 रिपोर्टर 

तुळजापूर तालुक्यातील आनदुर येथिल  खंडोबा देवस्थान स्ट्रस्ट च्या कारभराबाबत आक्षेप घेत  गावातीलच काही व्यकतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र खंडोबा देवस्थनचे सचिव सुनिल ढेपे यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. जर हे आरोप खरे असतील तर आरोप करणाराला एक लख रूपयेचे बक्षीस देण्यात येईल असे ढेपे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातुन आपले म्हणने मांडले आहे.


अणदूरच्या श्री खंडोबा  देवस्थानचा कारभार अत्यंत पारदर्शक सुरु असून, काही पोटशूळ उठलेली मंडळी देवस्थानच्या शेतजमिनीवर डोळा ठेवून नाहक  बदनाम करत आहेत. खाऊन - पिऊन  चक्री उपोषण करणाऱ्या अरविंद घोडके याने देवस्थानकडे तीन ते चार हजार एकर जमीन असल्याचे सिद्ध केल्यास त्यास एक लाख  रुपये बक्षीस देण्यात येईल आणि  हे खोटे ठरल्यास त्याने देवस्थानची नाक घासून माफी मागावी, असे आव्हान मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी दिले आहे.


अरविंद घोडके याने देवस्थानकडे ३ ते ४ हजार एकर जमीन असल्याचे सांगून,गुरव समाज  शेतजमिनीची विक्री करत असल्याचा खोटा आरोप केला आहे. वास्तविक श्री खंडोबा  देवस्थान नावे फक्त ८०० ते ९०० एकर जमीन असून पैकी  २५० एकर जमीन देवस्थानच्या देखभालीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.  ही जमीन छत्रपती शाहू महाराज यांनी तीनशे  वर्षांपूर्वी दान केली आहे. तसे ताम्रपट देवस्थानकडे उपलब्ध आहे.


श्री खंडोबा  देवस्थान समिती ( ट्रस्ट ) १९६५ मध्ये स्थापन झालेली असून, वेळोवेळी ऑडिट रिपोर्ट - अ मिळाला आहे. तसेच देवस्थान शेतजमिनी संदर्भात औरन्गाबाद खंडपिठाने काही महिन्यापूर्वी आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. देवस्थानची जमीन काढून घ्या, म्हणणे म्हणजे हा हायकोर्ट निकालाचा अवमान नाही का ? असा सवाल ढेपे यांनी विचारला आहे.

अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही गावाची लोकसंख्या  ५० हजार आहे, दोन्ही गावातील मिळून १०० ते १२० लोकांनी दि. १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला.हा मोर्चा प्रायोगिक होता. गाडी आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करूनही लोक आले नाहीत. घोडकेचा उपोषण आणि मोर्चा काढण्याचा बिझिनेस असून, त्याने आजवर किती मोर्चे काढले, त्याचे पुढे काय झाले हे तपासून पाहवे, असेही ढेपे यांनी म्हटले आहे.

अणदूर मध्ये सर्व्हे नंबर १५५ मध्ये १५ एकर गायरान जमीन होती, ही जमीन गावातील धनदांडग्यांनी बेकायदेशीर कबाला करून लाटली आहे.तसेच त्याचा कमर्शियल वापर सुरु केला आहे. ते आंदोलन, मोर्चे काढणाऱ्याला दिसत नाही का ? 

अणदूर श्री खंडोबा मंदिराभोवतीचे अतिक्रमण काढा म्हणाऱ्यांनी सर्वप्रथम बसस्थानक ते आणा चौकापर्यंतची अतिक्रमणे काढण्याची मागणी करावी, मग मंदिराभोवतीचे अतिक्रमण जरूर काढावे,.. 

अणदूर ते होर्टी  हे नॅशनल हायवेचे काम अरविंद घोडके याने केलेल्या सततच्या आंदोलनमुळे रखडले आहे, यामुळे रास्ता अपघात घडून अनेकांचे जीव गेले आहेत, त्याला सर्वश्री जबाबदार हा घोडके आहे. 

स्वतःच्या समाज बांधवाला बोगस रजिस्ट्री करून देऊन फसवणूक करणाऱ्यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवू नये.अणदूरच्या श्री खंडोबा मंदिरात स्व. सि. ना. आलुरे गुरुजी यांनी स्थापन केलेली जवाहर विद्यालय ही शाळा भरते. या शाळेतीळ अनेक मुले आज डॉक्टर, इंजिनियर आहेत. सचिन हराळे हा विद्यार्थी दहावी परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आला होता. अनेक विद्यार्थी मेरिट मध्ये आले आहेत. 


या शाळेला वर्षाला  केवळ ११ हजार  नाममात्र भाडे आहे. केवळ गुरुजींची आणि गावची  शाळा म्हणून आम्ही आदर करतो,  पण या शाळेतील मुलींची काही मुले छेडछाड करतात असा खोटा आरोप करून अरविंद घोडके या समाजकंटक  शाळेची बदनामी करीत आहे. 


गेल्या दहा वर्षात नळदुर्ग पोलीस स्टेशनला एक तरी छेडछाडीची तक्रार आहे का ? असल्यास आपण म्हणेल तो दंड देऊ. विनाकारण लोकात अफवा पसरवून, शाळेची, मंदिराची बदनामी करू नये. यामुळे गावाचे नुकसान होणार आहे. यात समाज कंटकाचे काय जाते, परिणाम गावाला भोगावे लागतात...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या