उस्मानाबाद रिपोर्टर
शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद ही अभिनव संकल्पना अँग्रोवन कडून राबविली जाते आहे. एक दिवसाच्या या महापरिषदेत राज्यातील आघाडीच्या शेतकरी उत्पादक कंपन्याचे निमंत्रीत प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील निमंत्रीत प्रतिनिधी मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथील नैतिक अँग्रो प्रोड्युसर कंपनी लि. चे चेअरमन नितीन घुले यांना निमंत्रीत करण्यात आलेले आहे.
सकाळ अँग्रोवन ने आयोजित केलेली महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपनीची एकदिवसीय महापरिषद आज दि . 2 सप्टेंबर रोजी पुणे येथे पार पडणार आहे. या महापरिषदेचे उदघाटन केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या महापरिषदेला महाराष्ट्र राज्याचे क्रुषी सचीव एकनाथ डवले हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या चळवळीला सम्रध्द करण्यासाठी आता शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद ही अभिनव संकल्पना अँग्रोवन कडून राबविली जाते आहे. एक दिवसाच्या या महापरिषदेत राज्यातील आघाडीच्या शेतकरी उत्पादक कंपन्याचे निमंत्रीत प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील निमंत्रीत प्रतिनिधी मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथील नैतिक अँग्रो प्रोड्युसर कंपनी लि. चे चेअरमन नितीन घुले यांना निमंत्रीत करण्यात आलेले आहे. आकांक्षीत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांच्या उन्नतीसाठी कंपनीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कार्याची दखल घेऊन सकाळ समुहाने त्यांना निमंत्रीत केले आहे. उच्च शिक्षीत नवतरूण शेतकरी यांना एकत्र घेऊन कंपनी स्थापन केलेली आहे. एफपीसी महापरिषदेच्या उस्मानाबाद जिल्हातून नैतिक अँग्रो प्रोड्युसर कंपनीच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या