जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महिलांसाठी मोफत रेडीमेंट गारमेट प्रशीक्षण

 रिपोर्टर

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उस्मानाबाद आयोजित मोफत अनुसूचित जाती(sc) मुली व महिलांसाठी मोफत रेडीमेड गारमेंट व फॅशन डिझायनिंग  प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सभागृह वाघोली येथे संपन्न झाले.

  कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री. पांडुरंग मोरे, मिटकॉन कार्यालयाचे जिल्हा समन्वयक श्री. व्ही. टी .चव्हाण, वाघोली चे उपसरपंच श्री. नितीन चव्हाण कार्यक्रम समन्वयक श्री. प्रशांत शशिकांत मते यांच्या हस्ते झाले. यामध्ये उपस्थित मुली व महिलांना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री. पांडुरंग मोरे, मिटकॉनचे जिल्हा समन्वयक श्री. व्ही. टी.चव्हाण, वाघोली चे उपसरपंच श्री. नितीन चव्हाण, कार्यक्रम समन्वयक श्री. प्रशांत शशिकांत मते यांनी उपस्थित मुली व महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. प्रशांत शशिकांत मते यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या