शिंदे सरकार'चं खातेवाटप जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा घणाघात- राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला प्रतिनिधीत्व नाही

 


मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळामध्ये भाजपला महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्याकडचे पाच मंत्री नाराज असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

जेव्हा तुमचं लक्ष्य शासनापेक्षा सरकारवर असतं, तेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराला 41 दिवस लागतात, यानंतर खातेवाटपात 5 दिवस जातात. खातेवाटपात सत्तेचं असंतुलन, महिला आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला प्रतिनिधीत्व नाही, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग इतक्या खात्यांची जबाबदारी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या