शिवसेनेने केली संभाजी ब्रिगेड बरोबर युती





रिपोर्टर 

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.आज करण्यात आली.

शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर आता राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज या युतीची घोषणा केली.संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की गेल्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना चांगलं लोकहित पाहिलंण् चांगले निर्णय घेतलेण् आता लोकशाही धोक्यात आलेली असताना छोटे पक्षए संघटना वाचवायच्या असतील तर एकत्र यावं लागेलए यावर आमचं एकमत झालंण् विधानसभा लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र लढण्याची तयारी केली जाणार आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की या लढवय्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरु आहे.  आपल्या विचारांचे लोक आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हव असे मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या