वाशी तालुक्यात पावसाची दांडी शेतकरी चिंताग्रस्तरिपोर्टर अनिल धावारे

तालुक्यातील अनेक भागात गतवर्ष अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मूग , कापूस पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी वाशी तालुक्यासह बावी शिवारत मुर्ग नक्षेत्रामधील पावसाने चांगले हजरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लगबगीने पेरणी पूर्ण केली. यंदा वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. कोरोना सारख्या महाभयंकर रोगातुन सावरतोय तोपर्यंत  आता मोठे संकट उभा ठाकले आहे दोन आठवडे भरापासून पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकरी राजा पुन्हा चिंतेत पडला आहे. पेरणीमुळे उसनेवारी उधार  करून बि बियाणे घेवन शेतात पेरणी केली मात्र गेल्या महिनाभरापासून पावसाचा पत्ता च नाही अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पीक वाचवण्या साठी जमेल तसं प्रयत्न सुरू केले आहेत तर कोरडवाहू शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने शेतातील पिके उन्हाने माना टाकत आहेत. वेळेवर पाऊस आला नाही तर शेतातील पिक वाळून जाणार का या चिंतेत शेतकरी पडला आहे.  वाशी तालुक्यातील  बावी , तेरखेडा, इंदापूर, सोनारवाडी ,गोजवाडा, मांडवा , इत्यादी गावांमध्ये शेतकरी राजाच्या पदरात पडणारे पिक निसर्ग राजा हिरावून घेतो की काय असा प्रश्न शेतकऱ्यातुन उपस्थित होतो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या