शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे पतसंस्थेत तिरंगा ध्वजाचे वाटप
 उस्मानाबाद रिपोर्टर

हर घर तिरंगा या अभियानातंर्गत तिरंगा ध्वज घरोघरी लावला जावा या उद्देशाने शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्था, श्री.स्वामी समर्थ बचत गट, धारासुर मर्दिनी महिला बचत गट यांच्या संयुक्त विदयमाने संस्थेच्या कार्यालयात आज शनिवारी ( दि13) रोजी सकाळी संस्थेचे सभासद, बचत गट सभासदांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.

                          भारतीय स्वातंञ्याचा अमॄत महोत्सव  देशभरात विविध उपक्रमासह साजरा करण्यात येत आहे.धाराशिव शहरातही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.हर घर तिरंगा हा उपक्रमाचा एक भाग असल्याने तिरंगा ध्वज घराघरो लावला जावा या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपा किसान मोर्चाचे पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे  यांनी  संस्थेचे सभासद, बचत गट सभासद, महिला सभासद  व सामान्य नागरिकांसाठी संस्थेत  तिरंगा ध्वज उपलब्ध असावा व ज्यांना हवा असेल त्यांना वाटप करण्यात यावा अशी संकल्पना मांडल्यानंतर संस्थेत तिरंगा ध्वज उपलब्ध करुन आज शनिवारी  तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.तसेच  तिरंगा ध्वज कोणास हवा असेल तर संस्थेच्या कार्यालयातुन घेऊन जावे असे आवाहनही श्री. कोळगे यांनी केले आहे यावेळी सभासद तथा पत्रकार सुभाष कदम- पाटील,बळवंत दळवे, श्रीकांत काशिद,तेजसिंह कोळगे, रणजितसिंह कोळगे,महिला सभासद गौरी मसलेकर, सुहासिनी कुलकर्णी,पुष्पलता मठपती,  शिवानी परदेशी, अनिता काशिद, मंजू क्षीरसागर, मोहिनी जोशी बचत गटाच्या सचिव वैशाली जोशी व्यवस्थापक शाम गंगावणे यांच्यासह कर्मचारी यांची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या