उस्मानाबाद
पोलीस खात्यात निरंतर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांस प्रतिवर्षी राष्ट्रपतीचे पोलीस पदक दिले जाते. सन- 2022 या वर्षातील पदक प्राप्तकर्त्यांची यादी नुकतीच जाहीर झाली. यात उप विभागयी पोलीस अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत आनंदे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
सुर्यकांत आनंदे, हे सन- 1987 मध्ये उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणुन रुजू झाले. सध्या ते पदोन्नतीने पोलीस उपनिरीक्षक म्हणून उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत. आनंदे यांनी तपास, शोध, गुन्ह्यास प्रतिबंध, दोश सिध्दी अशा त्यांच्या पोलीस खात्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना आजपर्यंत 271 बक्षीसे- प्रशस्तीपत्रे मिळाली असुन 1 मे 2010 रोजी महाराष्ट्र दिनी त्यांना मा.पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह पदक प्राप्त झाले आहे.
त्यांना मिळालेल्या या पोलीस पदकाबद्दल. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व आप्पर पोलीस अधीक्षक. नवनीत काँवत यांसह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या