हर घर तिरंगा अभियानात वाशी पोलीस स्टेशनचा सहभाग
उस्मानाबाद रिपोर्टर

 भारत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानामध्ये  वाशी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी  उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने हर घर तिरंगा फडकावून अमृत महोत्सव साजरा करावा आणि प्रत्येकाने या अभियानामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत देशातील जनता घर ,कार्यालय आदी ठिकाणी तिरंगा झेंडा फडकावून देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे त्याप्रमाणेच जिल्ह्यातील वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तिरंगा हाती घेऊन हर घर तिरंगा या अभियानात सहभाग नोंदवला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या