शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडी कडून मध्यराञी आटक
रिपोर्टर

. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अखेर अटक केली आहे. संजय राऊतांची रविवारी सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते. ईडी अधिकाऱ्यांची तीन पथकं संजय राऊतांविरोधात तपास करत होते. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. जवळपास 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊतांना याआधी दोनवेळा समन्स बजावले होते. पण राज्यसभेचं पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊतांनी चौकशीला जाणे टाळलं होते. अखेर ईडी अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास संजय राऊतांच्या घरावर छापा टाकला.


संजय राऊत यांची सलग नऊ तास चौकशी केल्यानंतर हालचालींना वेग आला. त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राऊतांच्या भांडूप आणि दादर या दोन्ही घरांच्या बाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर मुंबईतील बलार्ड पिअर भागातील ईडी कार्यालयाजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अतिशय जलद वेगाने घडामोडी घडत होत्या. त्यामुळे राऊतांना आता अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ईडीने त्यांना अटक केली आहे. ईडीला तपासात सहकार्य न करणे आणि घरातून बेहिशेबी रोकड सापडल्याने त्यांना अटक केल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या