डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात 5 वर्षात ३९ कोटींची विकास कामेः . निंबाळकर
उस्मानाबाद रिपोर्टर 

 .  येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या परिसरातील विविध विकास कामे करण्यासाठी गेल्या ५ वर्षात ३९ कोटी रुपयांचा निधी विद्यापीठ फंडातून खेचून आणलाण् त्या माध्यमातून परिसरात मुख्य प्रशासकीय इमारतीसह इतर १० विभागांचे करण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२९ ऑगस्ट रोजी दिली.

उस्मानाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होतेण् यावेळी डॉ. आंबेडकर विद्यापीठाचे संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाडए डॉण्नितीन पाटीलए मायक्रो बायोलॉजी विभागाचे प्रशांत दीक्षितए गणेश शिंदे आदी उपस्थित होतेण् पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले कीए विद्यापीठ उप परिसरात बांधण्यात आलेल्या इमारतीसाठी सर्व खर्च रक्कमेचे आकडे ;कोटीमध्येद्ध ते पुढील प्रमाणे. प्रशासकीय इमारतीसाठी ४. ५३ लाख रुपयेए विज्ञान भवन तळमजल्यासाठी ४ण्५३ लाख रुपयेए‌ मुलींच्या वस्तीगृहासाठी ३.४२ लाख रुपयेए उपहार ग्रहासाठी ९३ लाख रुपयेए अतिथीगृह २.२५ लाख रुपये विज्ञान भवनच्या पहिल्या मजल्यासाठी ‌४.८५ लाख रुपये खर्चून हे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहेण् तर ५ लाख रुपयांची कुपनलिकाए तलाव खोलीकरणासाठी ४ लाख रुपयेए ७० × ६० आकाराच्या विहिरीसाठी २३ लाख ५० हजार रुपयेए या परिसरात वृक्ष लागवडीसाठी ५ लाख ८२ हजार रुपयेए लावण्यात आलेल्या ७ हजार ५०० बांबू व इतर वृक्षांना ठिबक करण्यासाठी १० लाख ३५ हजार रुपयेए ५० केडब्ल्यु सौर ऊर्जा साठी ३२ लाख व मुख्य रस्ता तसेच विज्ञान भवन व मुलींचे वस्तीगृहपर्यंतच्या ८२० मीटर रस्त्यांसाठी १ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितलेण् विशेष म्हणजे या उपकेंद्रात महत्त्वाचे १० विभाग सुरु आहेतण् शासनाने ३० कोटी रुपयांची तरतूद करुन कुलगुरुए कुल सचिव व इतर पदे भरुन या उपकेंद्राचे पूर्ण विद्यापीठात रूपांतर करावे अशी मागणीही त्यांनी केली.

चौकट

मुलांच्या वस्तीगृहासाठी ७ कोटी ९५ रुपयेए विद्यापीठ संचालकांच्या निवासस्थानासाठी ७० लाख रुपयेए ग्रंथालय इमारतीसाठी ८ लाख रुपये व व्यवस्थापन शास्त्र इमारतीसाठी २ कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यास देखील मंजुरी मिळवून घेतलेली आहे. 

चौकट

या विद्यापीठ उपकेंद्रात बायोटेक्नॉलॉजीए मायक्रो बायोटेक्नॉलॉजीए फिजिक्सए केमिस्ट्रीए मॅथेमॅटिक्सए वॉटर ऍण्ड लॅन्ड मॅनेजमेंटए एमबीए एमसीए एमड इंग्लिश व नाट्यशास्त्र व लोककला आदी १० विभाग सुरू करण्यात आलेले आहेत. यासाठी आजपर्यंत ६७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे.

चौकट

या केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील माती व पाण्याचे परीक्षण व्हावे यासाठी ३२ लाख रुपये निधी उपलब्ध खर्च करुन प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहेण् त्यामुळे शेतकरी बांधवांनी रब्बी हंगाम संपल्यानंतर आपल्या शेतातील माती व पाण्याच्या नमुन्याचे परीक्षण करून घेऊन तज्ञांच्या शिफारशीनुसार आवश्यक खतांचा वापर करून पीक उत्पादन वाढवावे असे आवाहन त्यांनी केले.

चौकट

विद्यापीठाच्यावतीने मनोहर ज्ञानदेवराव देशमुख यांना जीवन साधना पुरस्काराने दि.३० ऑगस्ट रोजी गौरविण्यात येणार आहेण् त्याबरोबरच या परिसरात मंजूर असलेल्या कुलगुरु यांचे निवासस्थान व मुलांच्या वस्तीगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहेण् हा सोहळा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते व प्र.कुलगुरू श्याम शिरसाठए व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकरए प्राचार्य डॉण् जयसिंगराव देशमुखए संचालक दत्तात्रय गायकवाड कुलसचिव जयश्री सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या