उस्मानाबाद रिपोर्टर
साहित्यिक युवराज नळे यांनी लिहिलेल्या "कोरोना डेज" या कादंबरीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी, लातूर यांचा २०२१ चा "डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी राज्यस्तरीय पुरस्कार" घोषित करण्यात आला आहे. सदर संस्थेचे पुरस्कार वितरण चे हे १४ वे वर्ष आहे.
सदर पुरस्काराचे वितरण दि. ३१ जुलै २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता डॉ.भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र,शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
सदरचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी कडून युवराज नळे यांचे अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या