१५ जुलैपर्यंत वारकऱ्यांना टोलमधुन सूट

 

उस्मााबाद: रिपोर्टर


राज्य शासनाने आपाढी एकादशी २०२२ निमित्त दि. १५ जुलै २०२२ पर्यंत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच पथकरातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या नियंत्रण कक्षाव्दारे दिनांक १५ जुलै पर्यंत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच पथकरातून सूट मिळणेसाठी विहित नमुन्यातील सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत.


तेंव्हा पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सूट मिळणेसाठी विहीत नमुन्यातील सवलत प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावेत. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. प्रवेशपत्र प्राप्त करण्यासाठी  वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र, कर, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र इ. वैध कागदपत्रे कार्यालयात सादर करावीत.असेही आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या