अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना आवाहन

 

          


उस्मानाबाद रिपोर्टर 


 अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांची जीवीतहानी झाली असल्याची बातमी प्रसार माध्यमाव्दारे समोर आली आहे. त्या ठिकाणी भारतीय सेना दल,NDRF व अन्य बचाव व प्रतिसाद दल यांच्या मार्फत मदत व बचाव कार्य सुरू आहे.परंतू अद्याप काही भाविक बेपत्ता असल्याचीही बातमी समोर आली आहे.

त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हयातील जे भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत आणि सद्यस्थितीत त्यांचा संपर्क होत नाही अशा भाविकांच्या निकट नातेवाईकांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  वृशाली तेलोरे यांना 9665031744 या क्रमांकावर संपर्क साधुन तशी माहिती द्यावी.त्याचप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद संपर्क 02472-225618 टोल फ्री क्रमांक 1077 या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती द्यावी.असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.

या  दुर्घटनेच्या अनुषंगाने शासन स्तरावरून खालीलप्रमाणे हेल्प लाईन क्रमांक निर्गमित करण्यात आले आहेत.NDRF:011-23438252, 011-23438253.kashmir divisional help line No: 0194-2496240

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या