उस्मानाबाद तालुक्यातील आंबेवाडी येथील रस्त्यावरुन लातूरच्या दिशेने अवैध कत्तलीतील गोवंशीय मांसाची वाहतुक करणारा टेम्पो असल्याची गोपनीय माहीती बेंबळी पोलीसांना मिळाली होती. यावर बेंबळी पो.ठा. च्या पथकाने दि. 04 जुलै रोजी पहाटे आंबेवाडी गावातील चौकात सापळा लावला असता उस्मानाबादकडून उजनीकडे जाणारा आयशर ट्रक क्र. एम.एच. 42 एक्यू 4739 या टेम्पोमध्ये अवैधरित्या गोमांसाची वाहतुक होताना दिसली सदर टेम्पो पोलीसांनी ताब्यात घेतला असुन वाहातुक करणा—यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावर पोलीसांनी नमूद ट्रकचा चालक- मजहर सत्तार कुरेशी, रा. खिरणीमळा, उस्मानाबाद यांस त्या मांस वाहतुक परवाण्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 5,00,000 ₹ किंमतीच्या नमूद ट्रकसह त्यातील अंदाजे 12,00,000 ₹ किंमतीचे सुमारे 8 मेट्रीक टन गोवंशीय मांस जप्त करुन प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, बेंबळी डॉ. श्री. कालीदास सुतार यांच्यामार्फत मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तात्काळ नष्ट करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे विनंती पत्र पाठवले असून त्यांची संमती मिळताच तो मांस साठा नष्ट केला जाणार आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार- राजाराम झाकडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5, 9 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी पो.ठा. चे प्रभारी- मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोना- राजाराम झाकडे, रविकांत जगताप, ज्ञानेश्वर गुरव यांच्या पथकाने केली आहे.
0 टिप्पण्या