बंडखोरांच्या टोळीतुन परत आलेले उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांना उध्दव ठाकरे यांचे पत्र - आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

 


उस्मानाबाद रिपोर्टर 



 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यासारख्या शिवसैनिकावर दर्शविलेला विश्वास सार्थ ठरवून दाखविणे, हेच आता ध्येय असल्याची भावना शिवसेना जिल्हाप्रुमख तथा आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पत्राला उत्तर देताना व्यक्त केली.  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पत्र आज शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार कैलास घाडगे - पाटील यांना मिळाले आहे. यानंतर भावना व्यक्त करताना कैलास घाडगे - पाटील म्हणाले की, आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे पत्र प्राप्त झाले आणि एक अर्थाने कृतार्थ झालो. राजकारणात तत्व, निष्ठा ही मूल्ये पाळायचे बाळकडू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो शिवसैनिकांना पाजले आहे. सच्चा शिवसैनिक ही मूल्ये आजही प्रामाणिकपणे, तळमळीने पाळतो हे मागच्या काही दिवसांत संपूर्ण देशाने पाहिले आहे.   

राजकारणात सत्ता येते जाते, पदे मिळतात आणि जातातही. पण सच्च्या शिवसैनिकांच्या तत्वात काडीचाही अंतर कधी येत नसतो. 80 टक्के समाजकारण व केवळ 20 टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन संघर्षाला उतरलेल्या मावळ्यांना सत्ता-पदाची नक्कीच फिकीर नाही. शिवसेना आणि शिवसैनिक येणाऱया आव्हानांना निधडय़ा छातीने समोर जातात, हेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे. कित्येक आले आणि गेलेही, पण शिवसेना मजबुतपणे उभी आहे, ती कट्टर शिवसैनिक मावळ्यांच्या जीवावर असेही ते म्हणाले.  


शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले आमदार कैलास घाडगे - पाटील यांचे कौतूक 



शिवसेनेच्या संकटाच्या काळात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे - पाटील हे निष्ठेने शिवसेने सोबत राहिले. यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आमदार कैलास घाडगे - पाटील यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, शिवसेना हा आपला परिवार आहे. वंदनीय हिंदूह्रदयम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूह्रदयम्राट शिवसेनाप्रमुखानीच आपल्याला शिकविली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठे बाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण या निष्ठेचे पालन केले व वंदनीय हिंदूह्रदयम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक असल्याचे दाखवून दिले. कोणत्याही धमक्या व प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठने शिवसेनेसोबत राहिलात. आपल्या या भुमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेला बळ मिळाले.आशा मजकुराचे पत्र आमदार कैलास पाटील यांना पाठवण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या