सामाजीक वनीकरण विभागाचे काम कौतुकास्पद- रोपवाटीकेमध्ये केला जातोय दिड लाख रोपांचा साठा - निसर्ग सौदर्या बरोबर मिळतोय लोकांच्या हाताला रोजगार

 
उस्मानाबाद रिपोर्टर 


साडे सात हेक्टरवर पसरलेली आळणी येथिल सामाजीक वनीकरण विभागाची विविध जातीच्या रोपांची रोपवाटीका आगदी कौतुकास्पद असल्याचे दिसते.सुमारे दिडलाख रोपांचा साठा असलेली ही जिल्हयातील एकमेव शासकीय रोपवाटीका असुन प्रशासनाच्या आनेक विभागामध्ये या ठिकानाहुन गरजेनुसार वेगवेगळया झाडांची रोपं पुरवले जातात.डोंगरी झाडा बरोबर या ​नर्सरीमध्ये औषधी वनस्पतीच्या रोपांचा साठा सुध्दा उपलब्ध असल्याचे येथिल कर्मचारी यांच्याकडून सांगण्यात आले.निसर्ग सौदर्य वाढवण्या बरोबरच आसपासच्या गावातील मजुर लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचे काम सुध्दा सामाजीक वनीकरण विभागाच्या या रोपवाटीकेमधुन होत आहे. 


 उस्मानाबाद जिल्हयामध्ये सर्वात मोठी शासकीय नर्सरी म्हणून आळणी येथिल सामाजीक वनीकरण विभागाची नर्सर समजली जाते.जिल्हयातील  विविध शासकीय विभागाच्या कार्यालयामध्ये या नर्सरीमधुनच रोपांचा पुरवठा होतो.सुमारे 7 हेक्टर 78 आर एवढया क्षेत्रफळामध्ये ही रोपवाटीका पसरलेली असुन डोंगरी झाडासह आनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीच्या रोपटयांचा सामावेश यामध्ये आहे.या ठिकानी उपलब्ध असलेल्या रोपांमध्ये आंबा,कडुलिंब,वड,उंबर,जांबूळ,पिंपळ,कांचन,चिंच,अर्जन,करंज,शिशु पेरू,बदाम,सिताफळ,भेहडा,साग,इत्यादी वनस्पतींचा सामावेश आहे.या रोपांची निगा राखण्यसाठी दररोज 20 ते 25 महीला या ठिकाणी रोजनदारीवर काम करताना दिसतात.रोपांची आगदी शिस्तबध्द मांडणी आकर्षक वाहाड असल्याने आसपासच्या परिसरातील शेतकरी,व्यवसाईक,जिल्हा परिषद शाळा,खाजगी संस्थापक याच्याकडुन मोठया प्रमाणात विविध झाडांच्या रोपांची मागणी केली जाते.या नर्सरी मधुन रोजाना मोठया संख्येनी रोपाची विक्री देखील होताना दिसते.त्या ठिकानी उपस्थित कर्मचारी यांच्याशी विचारणा केली असता साधारनता तिन महीने आदी या रोपांच्या बियांची लागवड केली जात असुन जुन जुलैमध्ये ही रोपटी लावण्या योग्य होत असल्याचे सांगीतले.या रोपवाटीकेच्या माध्यमातुन निसर्ग सौदर्य वाढवण्या बरोबरच आसपासच्या गावातील लोकांच्या हाताला रोजगार देखील मिळत आहे.    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या