मुरूम पोलीसांची अवैध गुटख्या विरोधात मोठी कारवाई: 4 लाखाचा गुटका केला जप्त



 रिपोर्टर 

मुरूम पोलीस ठाण्याच्या हाददीमध्ये रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालीत असताना अक्कलकोट रस्त्यावरुन जाणारी इनोव्हा गाडी क्र. एम.एच. 12 एलडी 5117 ही पोलीसांनी संशयावरुन थांबवण्यात आली असता सदर गाडीमध्ये असलेला 4 लाख 9 हजार पाचशे रूपयांचा गुटका जप्त करण्यात आला. गाडीत असलेला माल हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. यावरुन निरीक्षक- नसरीन मुजावर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 328, 272, 273, 188, 34 अंतर्गत मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. 

उमरगा तालुक्यातील मुरूम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक 30 जुलै रोजी रात्री गस्त घालीत असताना आक्कलकोट रस्त्यावरून एक ईनोव्हा गाडी पोलीसयांना संशयास्पद दिसली सदर गाडीला थांबवून विचारपुस केली असता गाडीमध्ये पान मसाला आणि गुटखा असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.यावेळी कारमध्ये असलेल्या चालक व त्याचा सहकारी नरसिंह पवार व अनिल नवले, दोघे रा. बीड यांच्याकडे पोलीसांनी कारमधील पोत्यांविषयी विचारपुस केली. एकंदरीत त्या कारमधून प्रत्येकी 26 पोत्यांत गुटखा, पानमसाल्याची व सुगंधी तंबाखूची पुडकी असा 4,09,500 ₹ चा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ आढळल्याने पोलीसांनी जप्ती कारवाई केली होती.मुरुम पोलीस ठाण्याचे सपोनि-  इंगळे यांनी या कारवाईची माहिती तात्काळ उस्मानाबाद येथील अन्न औषध प्रशासनास दिली.त्यानुसार तेथील निरीक्षक- नसरीन मुजावर यांनी मुरुम पोलीस ठाण्यात येउन तो माल तपासला असता महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. यावरुन निरीक्षक- नसरीन मुजावर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 328, 272, 273, 188, 34 अंतर्गत मुरुम पोलीस ठाण्यात आज दि. 30 जुलै रोजी गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या