रिपोर्टर..,
प्रशांत शशिकांत मते यांची महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उस्मानाबाद येथे कार्यक्रम आयोजक/कार्यक्रम समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. तसेच कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(MCED )विभागीय कार्यालय औरंगाबाद व नाशिक विभागाचे विभागीय अधिकारी मा.डी. यु.थावरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन प्रशांत मते यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील कार्यरत स्वायत्त संस्था आहे. यामध्ये उद्योजकता विकास व स्वयंरोजगार संबंधित उपक्रम तसेच उद्योजकतेची निगडित कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी श्री. प्रशांत शशिकांत मते यांची कार्यक्रम आयोजक/कार्यक्रम समन्वयक म्हणून निवड तसेच निवड झालेल्यांना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी निवड तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागीय कार्यालय औरंगाबाद व नाशिकचे विभागीय अधिकारी मा. डी.यु. थावरे यांच्या हस्ते श्री. प्रशांत शशिकांत मते यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कार्यालय औरंगाबाद व जळगावचे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री. विनोद तुपे, औरंगाबाद चे कार्यक्रम समन्वयक प्रबोधन बनसोडे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या