आमदार तानजीराव सावंत यांच्या विरोधात परंडा येथे शिवसैनिकांची घोषणा बाजी

  परंडा तालूक्यातील शिवसैनिक शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा .


परंडा रिपोर्टर सुरेश बागडे 


शिवसेने चे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार तानाजीराव सावंत हे सहभागी झाल्याने धाराशिव व परंडा येथे सावंत यांच्या  निषेधार्थ घोषणा बाजी करून शिवसैनिकांनी निर्देशने केली आहे .


 परंडा शहरातील शिवसैनिकांनी दि २५ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सावंत यांच्या फोटोला शाई लाऊन घोषणा बाजी केली आहे .


 परंडा  तालूक्यातील सर्व शिवसैनिक माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वा खाली शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे यावेळी जनार्धन मेहेर यांनी सांगीतले .


या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर इतापे यांच्या सह शिवसैनिक उपास्थित होते .


शहरातील  व तालूक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .

 प्रसिद्धी पत्रकावर जनार्धन मेहेर , ता उप प्रमुख दिलिप रणभोर , माजी नगर अध्यक्ष शिवाजी मेहेर , माजी नगर अध्यक्षा राजश्री शिंदे शहर उप प्रमुख सुभाष शिंदे , माजी उप नगर अध्यक्ष इस्माईल कुरेशी , माजी नगर सेवक मकरंद जोशी , मिरा संजय कदम ,मैनुद्दीन तुटके , मन्नान बासले , अब्बास मुजावर ,  इरफान शेख , विनोद साळवे , शिवाजी बापू मेहेर , प्रकाश सोनवणे,उमेश परदेशी , महेमुद पठाण , संतोष गायकवाड , तुकाराम गायकवाड , दत्ता मेहेर , दत्तू धनवे , राहुल देवळे  , रईस मुजावर , रफीक मुजावर , प्रशांत गायकवाड , प्रितम डाके , रामलिंग डाके , इरफान सौदागर , कुणाल जाधव , चैतन्य यादव ,योगेश बुरंगे , मयूर वाघमारे , विकास साळुंके , यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या